क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त
जयंतीनिमित्त बोलताना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या भारताच्या इतिहासावर ज्यांची अमीट छाप आहे अशा स्त्री रत्न म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय स्त्री ने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या वर्षीपासून महिला व बाल विकास विभागातर्फे सावित्री उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणीनुसार मी आणि माझा विभाग महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत असल्याचे ॲड.ठाकूर त्यांनी सांगितले.
सावित्री उत्सव साजरा करताना राज्यातील सर्व अंगणवाड्यांमधे कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले. अंगणवाडी व प्रकल्प स्तरावर प्रतिमा पूजन अभिवाचन जनजागृती कार्यक्रम प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले. १०० टक्के लसीकरण करणा-या व पोषण माह मध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या बिट मधील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेनूसार एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन करणा-या जोडप्यांना गौरविण्यात आले. कोरोना काळात एकल झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहेत. आज अनाथ बालकांच्या घरी भेटही महिला व बाल विकास विभागाच्या अधिकार्यांनी दिली. विविध खेळात देशपातळीवर प्राविण्य प्राप्त केलेल्या मुलींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.