कारवाईदरम्यान सहाय्यक आयुक्तांच्या पथकावर हल्ला !! "कल्याण एपीएमसी मार्केटमधील धक्कादायक प्रकार"
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून प्लास्टिक बंदीबाबत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल आपल्या पथकासह पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करण्यास गेले. कारवाईदरम्यान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त मोकल आणि त्यांचे पथकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणातच व्यापाऱ्यांनी मार्केटमधील लाईट बंद करून या पथकाला शिवीगाळ करत त्यांना कांदे फेकून मारले. व्यापाऱ्यांची वाढती गर्दी पाहता पथकाने तेथून काढता पाय घेतला.
याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असल्याचे सहायक आयुक्त सुधीर मोकल यांनी सप्तरंग वृत्तपत्राशी बोलतानी हे सांगितले.