राज्यात ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त विरेंद्र सिंग संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.द्य
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८