समाजशास्र परिषदेच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रजासत्ताक महोत्सवाचे आयोजन

समाजशास्र परिषदेच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रजासत्ताक महोत्सवाचे आयोजन परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश खेत्री यांची माहिती

* रामदास फुटाणे, प्रतिभा अहिरे, प्रकाश घोडकें व डॉ. विनायक पवारसह राज्यातील मान्यवर कविंचा सहभाग

मुंबई प्रतिनिधी : कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद महाराष्ट्रच्या विद्यमाने लोकशाही मूल्यांची जोपासना व्हावी म्हणून दोन वर्षांपासून राज्यस्तरीय प्रजासत्ताक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत दि.२४-२५जानेवारी २०२२ सायंकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान ऑनलाइन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती परिषदेचे राज्य अध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश खेत्री  राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. आयवान जॉन यांनी दिली.

  यासंदर्भात अधिक माहिती देताना प्रा. खेत्री यांनी सांगितले की,कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद संपूर्ण राज्यात कार्यरत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परिषदेचे सदस्य, पदाधिकारी कार्यरत आहेत. राज्यात साडेतीन हजार सक्रिय सदस्य आहेत.२६जानेवारीला आपण राजेशाही, सरंजामशाही, हुकूमशाही व्यवस्था नाकारून प्रजासत्ताक राष्ट्रात रुपांतरीत झालो. लोकशाही मूल्यवस्थेचा जागर करण्यासाठी यावर्षी दोन दिवसीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उद्घाटक पुणे येथील सुप्रसिद्ध कवि विडंबनकार माजी आमदार रामदास फुटाणे हे करणार आहेत.महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी,पहिल्या आंतरराज्यीय विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष,प्रसिद्ध विद्रोही कवियत्री प्रो.डॉ. प्रतिभाताई अहिरे या राहणार आहेत.प्रमुख पाहुणे  म्हणून  पुणे येथील प्रसिद्ध चित्रपट गितकार प्रकाश घोडके राहणार आहेत. या कविसंमेलनात मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रा.डाॅ.शामल गरूड पेण येथील सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार प्रा.डॉ. विनायक पवार,वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ. महेश खरात,मुंबई येथील प्रा. ज्योती भारती आदी कवी सहभागी होणार आहेत.सुत्रसंचालन प्रा. सतिष म्हस्के करणार आहेत.

    दुसऱ्या दिवशी ता.२५जानेवारी रोजी होणाऱ्या कविसंमेलनाचे उदघाटन नागपूर येथील महाराष्ट्रातील पहिल्या गझलकारश्रीमती आशा पांडे यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध  कोकण येथील मालवणी लेखक व कवी रूजारिओ पिंटो हे राहणार आहेत. या कविसंमेलनात कोल्हापूर येथील भाऊसाहेब गोसावी मंदार पाटील मालवणी कवी अशोक आठलेकर,किनवट येथील अँड. दिपाली सोनकांबळे,औरंगाबाद येथील प्रा. उषा मोटे अहिराणी कवी जयराम मोरे प्रा.गोविंद  लहाने अक्षय भोईर प्रवीण दाभाड प्रा. अशोक दुधकर हे कवी सहभागी होणार आहेत.

    या कार्यक्रमास रसिकांनी ऑनलाइन सहभागी व्हावे असे आवाहन परिषदेचे सचिव डॉ. हेमंत सोनकांबळे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत पारखी कोषाध्यक्ष डॉ. व्यंकटेश खरात,कार्याध्यक्ष प्रा. सुनील शिंदे ,प्रा. शिवाजीराव होडगे, प्रा.ज्ञानेश्वर घुले, प्रा. रवींद्र धनगर,प्रा.आबासाहेब गाठे,प्रा.मंगेश कांडलकर,प्रा.अनिल खडसे,प्रा.सचिन खरे,प्रा. टी. के.सरगर व कनिष्ठ महाविद्यालय समाजशास्त्र परिषद, महाराष्ट्र संस्थेने केले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८