फ्रन्टलाइन वर्कर्स आणि हेल्थ वर्कर्स यांनी आज घेतला बूस्टर डोस!

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढतांना दिसत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आज पासून हेल्थ केअर वर्कर फ्रंन्ट लाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी प्रिकॉशन डोसची (बुस्टर डोस) व्यवस्था महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध करुन दिली आहे. अनेक हेल्पलाइन वर्कर्स आणि फ्रन्टलाइन वर्कर्स यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन बुस्टर डोस घेतला, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीदेखील आपल्या अधिका-यांसमवेत आज प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) घेतला. आयुक्तां समवेत महापालिकेच्या टास्क फोर्समधील डॉ. विक्रम जैन, डॉ. अमित बोटकोंडले, डॉ. हिमांशू ठक्कर यांनी तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, आरोग्य विभागाचे उपआयुक्त सुधाकर जगताप, महापालिका सचिव संजय जाधव, डॉ. विनोद दौंड,डॉ.रेखा दौंड तसेच इतर अधिकारी वर्गाने देखील आज प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) घेतला.

    कोरोना साथीपासून संरक्षण मिळण्यासाठी हेल्थ केअर वर्कर, फ्रंन्ट लाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनी प्राधान्याने (दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास ) प्रिकॉशन डोस घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८