महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम महापालिकेत उत्साहात संपन्न !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण आज  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करून ध्वजवंदन केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार उपायुक्त सुधाकर जगताप महापालिका सचिव संजय जाधव  उपायुक्त पल्लवी भागवत अर्चना दिवे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील  सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे इतर अधिकारी वर्ग मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

    यावेळी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वाहन ताफ्यात नव्याने समाविष्ट झालेल्या देवदूत या अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा वाहनाचे लोकार्पण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या अग्निशमन वाहनात लाईफ बॉय लाईफ जॅकेट पोर्टेबल फर्स्ट एड पोर्टेबल स्ट्रेचर, फोल्डिंग शिडी अशा अनेकविध सुविधा उपलब्ध आहेत.महापालिकेच्या डोंबिवली विभागातही  अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी फ व ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८