सांगली पालघर जिल्ह्यांसाठी पालक सचिवांची नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी : पालघर आणि सांगली जिल्ह्यांसाठी पालक सचिव पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास आणि पालघर जिल्ह्याच्या पालक सचिवपदी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन संचालक पदी आप्पासाहेब धुळाज

राज्याच्या महसूल व वन विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापन संचालक पदी आप्पासाहेब धुळाज रुजू झाले. धुळाज यांनी यापूर्वी राज्य कामगार विमा योजना आयुक्त, कोल्हापूर आणि लातूर येथे अपर जिल्हाधिकारी आणि नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल विभागाचे उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८