कल्याण ग्रामिण पट्टयातील ४८० महापालिका सफाई कर्मचारीऱ्यांचा महेश गायकवाड यांच्या महानगर सफाई कर्मचारी संघात प्रवेश !
कल्याण प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळण्यात आलेल्या २७ गावातील ग्रामपंचायतिंमध्ये कार्यरत असलेल्या रवी राव सफाई कर्मचारी युनियन च्या ४८० सफाई कामगारांनी महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 'महाराष्ट्र राज्य महानगर सफाई कर्मचारी संघात ' प्रवेश केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ठ असतांना कल्याण ग्रामिण पट्टयातील ग्रामपंचायती मध्ये सेवेत असलेल्या सफाई कर्मचार्यांना सेवेत कामय करण्यात आले होते . परंतु ही २७ गावे महापालिकेतून वगळण्यात आल्या नंतर तब्बल ४८० कर्मचार्यांना कंत्राटी पद्धतीवर सेवेत ठेवण्यात आले आहे . तेव्हापासून या कर्मचार्यांना वेतन वाढीसह विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.या सर्व कर्मचाऱ्यांनी रवीराव युनियनच्या माध्यमातून आपल्या समस्या पालिका प्रशासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या या प्रयत्नालायश येत नाही असे लक्षात येताच या सर्व कर्मचार्यांनी रविराव युनियनचा त्याग करीत त्यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड हे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य महानगर कर्मचारी सफाई संघात प्रवेश केला आहे.
या कर्मचारी संघाचे अध्यक्ष भारत गायकवाड उपाध्यक्ष नवीन गवळी यांनी संघात प्रवेश केलेल्या सर्व कर्मचार्यांचे स्वागत केले तसेच संघाच्या माध्यमातून लवकर कर्मचार्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येऊन समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८