व्यापारी फेरीवाले दुकानदार व नागरिक यांच्यावर यापुढे महापालिका करणार सक्त कारवाई !

कचरा विलगीकरण न करणाऱ्या कचरा उघड्यावर टाकणाऱ्या आणि प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापारी फेरीवाले दुकानदार व नागरिक यांच्यावर यापुढे महापालिका करणार सक्त कारवाई !

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार आणि घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी/कर्मचारी आणि विविध प्रभागातील सहा. आयुक्त यांनी कचरा विलगीकरण न करणाऱ्या, कचरा उघड्यावर टाकणाऱ्या आणि प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापारी, दुकानदार, फेरीवाले आणि नागरिक यांच्यावर सक्त कारवाई करण्यास प्रारंभ केला असून आज सकाळी घनकचरा विभागाचे उपायुक्त  अतुल पाटील, 3/क प्रभागाचे सहा. आयुक्त संजय कुमावत, स्वच्छता अधिकारी संदीप खिस्मतराव व कर्मचारी यांनी मोहिंदरसिंग  काबुलसिंग 

    रस्त्यावरील दुकानांची पाहणी करून सॅमसंग सर्व्हिस सेंटर, मल्हार संकुल यांचे गाळ्या समोर पॅकिंगचे थर्माकोल पडलेले असल्याने त्यांस रुपये 3,000/- दंड आकारला, शमसूद जामन (फ्रुट ज्युस सेंटर) या स्टॉलमध्ये ओला कचरा वर्गीकृत नसल्याने त्यांस रुपये 300/- दंड आकारण्यात आला आणि अंबिका स्वीट या दुकानात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांस रुपये 5,000/- असा एकूण रु.8300/- दंड आकारण्यात आला. 3/क प्रभागात मोहिंदरसिंग काबुलसिंग या रस्त्यावरील 105 आस्थापनांना त्यांचे दुकानात दोन कचऱ्याचे डबे ठेवून ओला व सुका कचरा वर्गीकरण करून महापालिकेच्या घंटागाडीत द्यावा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा आशयाच्या नोटीस बजावण्यात आल्या.

   7/ह प्रभागाचे सहा.आयुक्त संदीप रोकडे यांनी ह प्रभागात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून रु. 10,000/- दंड वसूल करीत सुमारे 2 किलो प्लास्टिक जप्त केले. त्याचप्रमाणे घन:श्याम गुप्ते रोड व महात्मा गांधी रोडवरील 18 आस्थापनांच्या तपासण्या करून त्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर व साठवणूक करू नये तसेच ओला व सुका कचरा वर्गीकरण करून स्वतंत्र डबे वापरण्याच्या सूचना दिल्या. 8/ग प्रभागात आज रस्त्यावर कचरा टाकल्याबाबत रु. 3,000/- दंडात्मक कारवाई करण्यात आले त्याचप्रमाणे कचऱ्याचे डबे न ठेवणाऱ्या दुकानदारांवर रु. 1,500/-अशी एकूण रु.4500/- दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 यापुढेही ही मोहीम अशीच चालू राहणार असून नागरिक, व्यापारी, दुकानदार  यांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून महापालिकेच्या घंटागाडीत द्यावा तसेच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात येत आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८