आनंद विश्व गुरुकुल मध्ये बालमेळावा उत्साहात संपन्न

ठाणे प्रतिनिधी : मुलांचे बालपण जोपासण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी आनंद विश्व गुरुकुल ए. सी. सी. सिमेंट कॉलनी समोर  ठाणे.(प)   येथे बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या बालमेळाव्यात विद्यार्थ्यांनी व मोठ्यांनी दिलखुलास आनंद लुटला.

   या मेळाव्याचे आकर्षण होते लहान मुले त्यांचे शिक्षक पालक यांनी लावलेले खाण्या-पिण्याचे पदार्थ शोभेच्या वस्तू कपडे दागिने इत्यादींची दुकाने  व आकर्षक पाळणे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने पालक व बाहेरील व्यक्ती उपस्थित होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या टिकाऊ वस्तू  मांडण्यात आल्या होत्या. या वस्तू पाहून विद्यार्थ्यांचे पालक व बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी कौतुक केले. 

    १९ नोव्हें २०२२ रोजी शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल ए. सी. सी. सिमेंट कॉलनी समोर  ठाणे. (प) बालमेळाव्याचे उदघाटन प्रमुख पाहुण्या, सोनी मराठी वाहिनी वरील "सुंदर आमचे घर" या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वेदश्री दळी (प्रणाली) व स्टार प्रवाह वाहिनी वरील "रंग माझा वेगळा" या मालिकेतील सुप्रसिद्ध बालकलाकार कुमारी. स्पृहा दळी (दिपिका) संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे सर सचिव डॉ.प्रदीप ढवळ सर  संस्थेच्या विश्वस्त व जेष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ . हर्षला लिखिते कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. सीमा हर्डीकर कौशल्य विकास विभागाच्या समन्वयक मयुरा गुप्ते मेळाव्याच्या मार्गदर्शिका मुख्याध्यापिका डॉ.वैदही कोलंबकर समन्वयक स्वराली माने यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

   या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ वैदही कोलंबकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक सहभागी विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील मेहनत घेऊन हा मेळावा यशस्वी केला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८