२८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत भूमि अभिलेख विभागाची ऑनलाईन परीक्षा

मुंबई प्रतिनिधी  : भूमि अभिलेख विभागातील गट-क समूह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) २८ ते ३० भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दि ९ डिसेंबर २०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती.त्यानुसार ९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्यानंतर या अर्जदाराना विभागाकडून २८ फेब्रुवारी २०२२ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

    छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. भूमि अभिलेख विभागातील गट-क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत. अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील ४ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

    परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांच्या परीक्षा प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी.परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीता लिंक देखील दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात  आली आहे, असे तवरेज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.व्हेंबर २०२२ या कालावधीत आयबीपीएस  कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे,असे पुणे भूमी अभिलेखचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८