जनआधार फाऊंडेशनचे कोरोना महासंकटात मोठे कार्य -राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते जनआधार फाऊंडेशनला सन्मानपत्र देउन सन्मानि

सोलापूर प्रतिनिधी : येथील जनआधार फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते आनंद गोसकी यांनी गेल्या १० वर्षापासून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या मुंबई येथील निवासस्थानी त्यांच्या हस्ते जनआधार फाऊंडेशनला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.बालपणीच पितृछत्र हरविलेले आनंद गोसकी यांनी संघर्षमय प्रवासात सर्वसामान्य कुटुंबांना आपल्या परीने सहकार्य करण्याकरिता जनआधार फाऊंडेशनची पायाभरणी केली. जनआधार फाऊंडेशनच्या माध्यमातून आनंद गोसकी यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी अष्टोप्रहर झटत आहेत.

    गेल्या १० वर्षात, आनंद मधुकर गोसकी हे 'प्रेझेंट ऑन कॉल' पध्दतीने सर्वांना हिरीरीने मदत करीत असतात. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आयोजित केली. या माध्यमातून गरजूंना रक्ताची उपलब्धता करण्यापासून, प्रसंगी ते मोफत रक्त उपलब्ध करण्यापर्यंत सोय करीत आले आहेत.पूर्व भागातील जनआधार फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याबद्दल आनंद गोसकी यांना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मानत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी राज्यापालांकडुन गोसकी यांना पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छाही दिल्या.

जनआधार फाऊंडेशनचे कोरोना महासंकटात मोठे कार्य

   कोरोना काळात 'डाॅक्टर आपल्या दारी' उपक्रम घेऊन मोफत आरोग्य तपासणी अन् औषधांचं वितरण, बेघर, मनोरूग्ण तसेच धान्यवाटप, गरजूंना तीन महिने दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था, कोरोनाच्या काळात 'जनआधार'ने घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनिंगद्वारे आरोग्याची प्राथमिक तपासणी, आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या अर्सेनिक अल्बम  गोळ्यांचे  मोफत वाटप करण्याबरोबरच अवाजवी वैद्यकीय बिल आकारण्यात आल्याच्या तक्रारी संदर्भातही आनंद गोसकी यांनी  वेळोवेळी आवाज उठवला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८