दिवाणी न्यायाधीश न्यायदंडाधिकारी पदाच्या मुलाखतीनंतर पाच तासांत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या मुख्य कार्यालयात दिनांक ०९ ते १७ जानेवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती पार पडल्यानंतर त्याच दिवशी अवघ्या ५ तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांना भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out ) दिनांक २४ जानेवारी, २०२३ पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तद्नंतर अंतिम शिफारस यादी गुणवत्ता यादीसह आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.