करिअर हे साधन नसून साध्य आहे हे लक्षात ठेवून करिअर निवडायला हवे. ज्या कारणासाठी करिअर निवडायचे आहे ते कारण कळायवा हवे, शासकीय सेवेत येण्याचे कारण काय ? उद्देश काय ? हे कायम लक्षात ठेवायला हवे. ज्ञान आणि शहाणपण या वेगळ्या गोष्टी आहेत. माहितीपासून ज्ञानापर्यतची प्रक्रिया शिकण्यासाठी विषयापलिकडे अवांतर वाचन करणे गरजेचे आहे. करिअर निवडताना विचारवंतांचा सल्ला घेणे, चुका न करता व्यवस्थित नियोजन कसे करावे याकडे लक्ष द्यायला हवे. पालकांनी, कुटूंबाने पाल्याच्या मागे खंबीरपणे उभे रहायला हवे, पाल्यांनीही अल्पसंतुष्ट, आत्मसंतुष्ट न राहता पुढे कोणती क्षेत्रे निवडायची आहेत, हे कळणेही महत्वाचे असल्याची माहिती भूषण गगराणी यांनी दिली.अध्यक्षस्थानावरून बोलताना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, १० वी व युपीएससी प्रमाणेच १२ वी ची परिक्षाही महत्वाची आहे. सिव्हिल सर्विसचा अभ्यास करताना सर्वच परिक्षा सिरियस घ्यायला हव्यात. जुन्या वाईट सवयी जाऊन नव्या चांगल्या सवयी लागत असतात. नोकरीत सेट होणे ही वाईट सवय आहे. पाॅवर, सोशल ॲप्रुअल, तोंडावर केली जाणारी तारीफ, यामुळे आत्मसंतुष्टता येते. आपले डोक खांद्यावर व पाय जमीनीवर राहत नाहित. यातुन सावध रहायला हवे. करिअर निवडताना आनंदी आयुष्य, दिशा स्पष्ट व कशासाठी, कोणासाठी काम करायचे आहे, हे कळायला हवे, यासाठी सर्वांगीण वाचन करायला हवे, प्रायोरीटी ठरवायला हवी. दिवसभाराच्या वेळेचे नियोजन करायला हवे. तर करिअर मध्ये नक्किच यश मिळेल अशी ग्वाही अभिजित बांगर यांनी दिली.
प्रास्ताविक करताना शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ यांनी सागितले की, आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाची स्थापना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून झाली आहे. या महाविद्यालयात प्लेग्रुप पासून ते एलएलएम, पॅरामेडिकल, नर्सिग, फायर फायटिंग, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, सिनिअर कॉलेज पर्यंत सर्वच सेक्शन चालवित आहोत, एक मिशन म्हणून आम्ही सर्वजण काम करीत आहोत, याचे नाव आनंद विश्व गुरुकुल, हे दिघे साहेबांचे स्वप्न होते ते ना.एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामुळे प्रत्यक्ष अवतरले आहे. आज येथे ५५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आनंद दिघेसाहेब मला म्हणायचे, 'ढवळसर अशी शाळा सुरु करा जिथे घंटा वाजविल्यावर मुले शाळेतुन पळता कामा नये तर शाळेच्या प्रांगणात रांगत राहिली पाहिजेत.' या महाविद्यालयात विद्यार्थांच्या कलेला वाव देणा-या १७ ॲक्टीव्हिटी होतात. गुरुवर्य आनंद दिघे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांचा राजकारणाबरोबरच सर्वच क्षेत्रात वावर होता. साहित्यिक, खेळाडू, विश्लेषक यांच्याशी त्यांचे घनिष्ट नाते होते. ठाणे शहरात पूर्वी अनेक व्याख्यानमाला व्हायच्या, आताही होत आहेत. मात्र आनंद दिघे यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरु व्हावी अशी आमची इच्छा होती. तिची पूर्तता आता आम्ही करत आहोत अशी माहिती डाॅ. प्रदिप डवळ यांनी दिली.
आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालयच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲड. सुयश प्रधान, आनंद विश्व गुरुकुल प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डाॅ. वैदेही कोळंबकर, आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सीमा हर्डीकर, आनंद विश्व गुरुकुल कौशल्य प्रशिक्षण विभागाच्या समन्वयक मयुरा गुप्ते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. चित्रकार योगेश पंडीत यांनी रेखाटलेले ठामपा आयुक्त अभिजित बांगर व मुख्यमंत्र्याचे अव्वर मुख्य सचिव भूषण गगराणी यांची दोघांनाही छायाचित्रे भेट म्हणून देण्यात आली.