बायोमेट्रिक हजेरीसाठी खर्च केलेले ८३ लाख रुपये पाण्यात गेले ?

माहिती अधिकारी हे पद प्रमोद कांबळे यांनी कोठून आणले आहेत...

ल्याण प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिकेने अधिकारी कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने होण्यासाठी एप्रिल-२०१६ मध्ये ८३,२४, ७६०/ रूपये (तिऱ्यांशी लाख चोबीस हजार सातशे साठ) ऐवढा खर्च करून माईटेक प्रा. लि. या कंपनीला काम दिले होते त्यामुळे अधिकारी कर्मचारी हे कार्यालयीन उपस्थिती वेळेत लावून कार्यालयात वेळेवर हजर होत होते लाखो रुपये खर्चून मनपाने मुख्यालय-८ प्रभाग क्षेत्र-१० हजेरी-४३ शाळे-७७ रुग्णालय-३ फायर ब्रिगेड-४ डिपो-३ हेल्थ पोस्ट-७ अशी एकूण १५५ ठिकाणी बायोमेट्रिक हजेरीचे मशीन लावले होते सदर कंपनीसोबत तीन वर्षाचा देखभाल दुरुस्तीचा करार करण्यात आला होता आता हा करार संपुष्टात आला असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहेत अधिक माहिती अशी आहेत.

     माहिती अधिकार कार्यकर्ते तथा पत्रकार विनायक चव्हाण यांनी फेब्रुवारी २०२३ ला महानगरपालिकेला माहिती अधिकार अधिनियम-२००५ नुसार अर्ज सादर केला होता त्याला महानगरपालिकेचे प्रमोद कांबळे जन माहिती अधिकारी तथा सिस्टम अनालिस्ट संगणक विभाग यांनी उत्तर देताना अशा प्रकारे माहिती दिली त्यामध्ये ही गंभीर बाब उघड झाली विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या जन माहिती अधिकारी व प्रथम आपली अधिकारी यांना या कायद्याचे प्रशिक्षण जानेवारी २०२३ मध्ये यशदा पुणे या शासनाच्या शिखर संस्थेकडून देण्यात आले होते तरी अनेक अधिकारी हे कायद्यानुसार माहिती देण्याऐवजी आपल्या मनमानीप्रमाणे कायद्याचा वापर करीत आहेत.

     चव्हाण यांनी सर्व माहिती छायांकित व साक्षांकित प्रति मध्ये मागणी केली होती परंतु त्यांना सर्व माहिती पूर्ण ई-मेलवर स्कॅन करून पाठवण्यात आली दुसरी गंभीर बाब म्हणजे प्रमोद कांबळे यांनी माहिती अधिकारी असा उल्लेख केला आहेत परंतु माहिती अधिकारी हे पद कायद्यातच अस्तित्वात नाही हे जन माहिती अधिकारी असे पद आहेत मग असा प्रश्न निर्माण होतो की प्रशिक्षणामध्ये नेमकं यांना काय शिकवले किंवा सांगितले जाते असा प्रश्न अनेक कल्याण डोंबिवलीतील जागृत नागरिक विचारत आहेत.

     लाखो रुपये खर्च करून बायोमेट्रिक हजेरी मशीन बसवले आहेत तर ते अनेक वर्षापासून बंद पडले जनतेचा पैसा मनपा अशाप्रकारे उडवणार असेल तर त्यावर अधिकारी यांना कधी चाप बसेल आणि बायोमेट्रिक हजेरी परत कधीपासून सुरू होईल याबाबत कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना पडलेला हा प्रश्न सुटेल का तसेच चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करणाऱ्या प्रमोद कांबळे यांच्यावर कारवाई होण्यासाठी आपण यांची तक्रार राज्य माहिती आयोग नगरविकास विभाग आयुक्त कं.डो.म.पा. यांच्याकडे करणार आहेत.

     याबाबत संबंधित विभागातील अधिकारी यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला असता केला यांच्याकडून कुणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८