विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमा

विलेपार्ले येथील मन की बात कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

मुंबई प्रतिनिधी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आजच्या शतकी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ले येथील घैसास सभागृहात उपस्थित होते.कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन आमदार आशिष शेलार आमदार पराग आळवणी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत मराठी अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह विलेपार्ले परिसरातील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

   सर्व मान्यवरांचे सकाळी 10.45 वाजता घैसास सभागृहात आगमन झाले. मान्यवरांच्या सन्मान कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 100 व्या 'मन की बात' कार्यक्रमाचे प्रसारण सुरू झाले. लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांनी टाळ्या वाजवून 100 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे स्वागत केले.  या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सोय मुंबईतील 5 हजार 200 ठिकाणी करण्यात आली होती.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८