राजधानीत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

वी दिल्ली प्रतिनिधी : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत अरोरा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  छत्रपती संभाजी महाराज यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (प्र. सु.र.व का. ) सुजाता सैनिक यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव प्रकाश इंदलकर सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कक्ष अधिकारी पल्लवी कदम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८