मनु कुमार श्रीवास्तव यांनी घेतली राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्तपदाची शपथ

मुबई प्रतिनिधी : लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मनु कुमार श्रीवास्तव यांना राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त पदाची शपथ दिली.आज मंत्रालयात राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त या पदांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बलदेव हरपाल सिंग यांना राज्य लोकसेवा हक्क आयुक्त पदाची (कोकण, महसूल विभाग) आणि भूपेंद्र एम.गुरव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ न्यायमूर्ती कानडे यांनी दिली.

   या सोहळ्यास मुख्य सचिव मनोज सौनिक  उपलोकायुक्त संजय भाटिया  सर्व विभागीय लोकसेवा हक्क आयुक्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसेवा हक्क आयुक्त पुणे दिलीप शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८