मुंबई प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांचे लवकरच फायर ऑडिट करण्यात येईल असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने धोका निर्माण झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्व सुनील राऊत अमित देशमुख सुनील प्रभू अमिन पटेल आशिष शेलार राम कदम राजेश टोपे अजय चौधरी रवी राणा यांनी उपस्थित केला होता.
मंत्री सामंत म्हणाले मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेल्या विविध रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे.ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट राहिले आहे. किंवा काही त्रुटी राहिल्या आहेत त्या लवकर पूर्ण करून अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आणि फायर ऑडिट प्रक्रिया ९० दिवसात करण्याच्या सूचना देण्यात येतील.तसेच रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.