लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांचे रेकॉर्ड
दिल्ली विशेष प्रतिनिधी : 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. गेल्या दहा वर्षांत देशाची प्रगती झाल्याचे आकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. तसेच मोठ्या घोषणाही पंतप्रधानांनी केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदींचे मोठे भाषण होत आली आहेत. त्यात त्यांनी अनेक विक्रम केले आहेत. यंदा त्यांनी 89 मिनिटे भाषण करून आपल्याच भाषणांचे विक्रम मोडले आहेत.
मागील स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी 83 मिनिटांचे भाषण केले होते. 2015 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी 86 मिनिटाचे भाषण करून पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचे रेकॉर्ड तोडले होते. तर केवळ एकावेळी त्यांनी एका तासापेक्षा कमी भाषण केले आहे. 2017 च्या स्वांतत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी केवळ 56 मिनिटे भाषण केले होते. आतापर्यंतचे हे त्यांचे सर्वात छोटे भाषण होते.
तर मोदी यांनी 2016 च्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्यांच्या 86 मिनिटांच्या भाषणाचे रेकॉर्ड मोडले होते. त्यावेळी त्यांनी सर्वांत मोठे म्हणजे तब्बल 96 मिनिटांचे भाषण केले होते. यंदा त्यांनी लाल किल्ल्यावरून 89 मिनिटे देशाला संबोधित केले आहे. त्यामुळे मोदी यांनी आपल्याच भाषणाचे जुने रेकॉर्ड मोडलेले आहेत. मोदी यांनी 2014 ला पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी 65 मिनिटाचे भाषण केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण-2014-65 मिनिटे 2015-86 मिनिटे 2016-96 मिनिटे 2017-56 मिनिटे 2018-82 मिनिटे 2019-93 मिनिटे, 2020-86 मिनिटे 2021-88 मिनिटे 2022-83 मिनिटे 2023-89 मिनिटे
कोणी किती वेळा ध्वजारोहण केले ?
सर्वात जास्त ध्वजारोहण करण्याचा विक्रम पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. लाल किल्ल्यावरून त्यांनी सर्वाधिक 17 वेळा ध्वजारोहण केले आहेत. नेहरू 1947 ते 1964 पर्यंत पंतप्रधान होते. तर इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरून 16 वेळा देशाला संबोधित केले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. दोघांनी दहा वेळा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले आहे.