फुलंब्री येथील धर्मांतराच्या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंई प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील धर्मांतराच्या घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य हरीभाऊ बागडे यांनी मांडली होती.

  उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की लव्ह जिहाद बाबत विविध राज्यांकडून केलेले  कायदे मागविण्यात आले आहेत. त्याचा अभ्यास सुरू असून याबाबतचा कायदा करण्याचा प्रस्ताव  राज्य शासनच्या विचाराधीन आहे.मुलींना फूस लावून पळवून धर्मांतरण करून लग्न करण्याच्या प्रकरणांमध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांनी एसओपी तयार करून सर्व पोलिस ठाणे यांना कळवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सदस्य सर्व राम सातपुते हरिष पिंपळे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८