विशेष प्रतिनिधी चित्रलेखा रासने : यंदाच्या वर्ल्डकप २०२३चे यजमानपद भारताला मिळाले असून त्याची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून होणार आहे.त्याआधी ४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा आयोजित केला जाऊ शकतो.या रंगतदार कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स भाग घेऊ शकतात. त्या दिवशी सर्व १० संघांचे कर्णधारही तेथे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी, स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि गेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत झालेला संघ न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
2019 मध्ये याआधीच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही दोन्ही संघ आमनेसामने आले होते. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील 10 शहरांमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.यंदाही विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन समारंभात सर्व 10 संघांचे कर्णधार अहमदाबादमध्ये उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) 'कॅप्टन डे' कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे.
या उद्घाटन समारंभात आयसीसी कार्यकारी मंडळाचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत. ICC सोबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे कार्यकारी मंडळ सदस्य देखील उद्घाटन समारंभात उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, 12 वर्षांनंतर आशियामध्ये एकदिवसीय विश्वचषक होत असून यापूर्वी 2011 मध्ये भारत श्रीलंका आणि बांगलादेश यांनी संयुक्तपणे विश्वचषक आयोजित केला होता. त्यानंतर बांग्लादेशातील ढाका शहरात उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी उद्घाटन सोहळ्यात सर्व संघांच्या कर्णधारांना रिक्षातून मंचावर आणण्यात आले.असंच वातावरण यावेळी 4 ऑक्टोबरलाही पाहायला मिळणार आहे.