डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची प्रचंड हानी-कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई प्रतिनिधी : सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ तथा स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनामुळे कृषी क्षेत्राची प्रचंड हानी झाली असल्याची खंत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत ट्विट करून मुंडे यांनी डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

    कृषी क्षेत्रात क्रांती घडवत डॉ. स्वामीनाथन यांनी गहू तांदूळ आदी धान्याचे अधिकाधिक उत्पन्न देणारे वाण विकसित केले. त्यांच्या योगदानामुळे अन्नधान्याच्या बाबतीत देशाचे इतर देशांवरील अवलंबित्व कायमचे संपले. 

  विविध प्रशासकीय पदे भूषवत डॉ. स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात संशोधन केले. डॉ.स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेले योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८