मराठा समाजाला ५० टक्केच्या आत आरक्षण देणे शक्य..-खासदार हरिभाऊ राठोड

न्नड प्रतिनिधी : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अत्यंत जटील झाला असून हा लढा अत्यंत तीव्र झाला आहे हा लढा सरकारला पेलवणार नाही आणि झेपवणार पण नाही असे वारंवार जरांगे पाटील सांगत आहेत ५० टक्केच्या आत ओबीसी मधुन संविधानात्मक आणि कायमस्वरूपी टिकणारे असे  आरक्षण मिळावे ही मागणी जोर धरू लागली आहे.

   हे आरक्षण देणे शक्य आहे  त्याचा फॉर्मुला माझ्याकडे  तयार आहे  असे आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.सरकारला आणि आंदोलकांना हा प्रश्न सोडवायचा असल्यास त्यांनी मी सुचवलेला फार्मूलाचा आभ्यास करावा आणि निर्णय घ्यावा जेणेकरून मराठा समाजालाही ५०% च्या आत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता संविधानात्मक व कायमस्वरूपी टिकणाऱ आरक्षण मिळणे शक्य होईल असे माजी हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८