ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

मुंबई प्रतिनिधी चित्रलेखाराज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना जाहीर झाला आहे. संगीत आणि गायन क्षेत्रातील वाडकर यांच्या योगदानाची दखल घेण्यात येऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

  सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव २०२ पुरस्कारासाठी पंडित उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले आहे.तर २०२ च्या पुरस्कारासाठी पंडित शशिकांत श्रीधर मुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२ सुहासिनी देशपांडे यांना जाहीर झाला आहे. 

 २०२ च्या पुरस्कारासाठी अशोक समेळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०२ साठी नयना आपटे यांचे तर २०२ च्या पुरस्कारासाठी पंडित मकरंद कुंडले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र संपन्न व्हावे तसेच यासाठी तत्पर आहोत अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८