नवीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची विनायक चव्हाण ठाणे संपर्कप्रमुख यांनी घेतली भेट

ल्याण प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नवेने नियुक्त झालेल्या आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांची आमचे प्रतिनिधी तथा माहिती अधिकार महासंघाचे ठाणे संपर्कप्रमुख विनायक चव्हाण आणि कल्याण शहर प्रचार प्रमुख विनोद काळकोपरे यांनी सदिच्छा भेट घेऊन अनेक भष्टाचार होत असलेल्या विषयाची यादी बाबत नवीन आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले.

  यामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या उप-आयुक्त अर्चना दिवे या माहिती अधिकार कायद्या नुसार सुनावणी घेत नसल्याने माहिती मिळत नाही.बहुउद्देशीय कामगार यांच्या बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिवे यांनी माया जमा केली ? यांची चौकशी व्हावी कारण निम्म्या उन अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द का करण्यात आल्या काही कर्मचारी बदली होऊन ही त्या ठिकाणी काम करीत नाही.ज्या मध्ये वाहन विभागातील डोंबिवली येथील एका कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत.

  वाहन विभागात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार चालू असून प्रवीण पवार उप-अभियंता तथा प्रभारी कार्यकारी अभियंता यांचे आजपर्यंत निलंबन का झाले नाही यांच्या सोबत तत्कालीन आयुक्त सहभागी होते ? यांची चौकशी व्हावी. अशाप्रकारच्या अनेक विषयावर सखोल चौकशी व्हावी याबाबत नवीन आयुक्त यांनी भष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही लवकर चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८