ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे कालवश लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भावाची एक्झिट !

मुबंई प्रतिनिधी भाग्यश्री रासने : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचे निधन झाले.मागील काही वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते.मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.आज अखेर कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली.वयाच्या 78 व्या वर्षी रवींद्र बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला.दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते.नंतर दोन दिवसांनी मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.रवींद्र बेर्डे हे दिवंगत प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. त्यांनी आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikanrt Berde) यांनी अनेक चित्रपटांत काम केले होते. 

  रवींद्र बेर्डे यांना घशाचा कॅन्सर झाला होता.त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.त्यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर दोन दिवसांआधीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. मात्र, घरी आल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या मागे पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.याआधी १९९५ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.त्यावेळी मात्र या आजारातून ते बरे झाले होते.नंतर २०११ मध्ये त्यांना घशाचे कर्करोगाचे निदान झाले.तेव्हापासून आजपर्यंत ते या आजाराशी संघर्ष करत होते.आज मात्र त्यांचा हा संघर्ष अपयशी ठरला. वयाच्या ७८ व्या वर्षी रवींद्र बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतला.

  रवींद्र बेर्डे यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीबाबत बोलायचे तर चंगू मंगू एक गाडी बाकी अनाडी हाच सूनबाईचा भाऊ खतरनाक हमाल दे धमाल थरथराट उचला रे उचला यांसारख्या ३०० पेक्ष जास्त चित्रपटात त्यांनी काम केले. तसेच पाच हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलं.मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ महेश कोठारे विजय चव्हाण विजू खोटे सुधीर जोशी भरत जाधव यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच गाजली होती.रवींद्र बेर्डे यांनी सिंघम चिंगी यांसारख्या काही हिंदी चित्रपटांतूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८