१२ विक्रेत्यांकडून रक्कम रु. १२००० दंडांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील ३८२ च्या तरतुदीनुसार मानवी आहारासाठी योजलेल्या जनावराच्या मांसाची विक्री करण्यासाठी महापालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे.त्यानुसार बाजार व परवाना विभागामार्फत घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार ज्या चिकन व मटण विक्रेत्यांनी महापालिकेकडून अद्याप परवाना घेतलेला नाही अथवा घेतलेल्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही अशा ब व क प्रभाग क्षेत्रांतर्गत विक्रेत्यांवर आज धाड टाकून त्यांच्या परवान्यांची तपासणी करण्यात आली.आज करण्यात आलेल्या तपासणीमध्ये १० चिकन विक्रेत्यांनी तर ०७ विक्रेत्यांनी परवाना नुतनीकरण न केल्याने त्यांच्याकडून रु. ३८०००/- दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

  तसेच ज्या विक्रेत्यांनी परवाना घेतलेला नाही अशा १२ विक्रेत्यांकडून रक्कम रु. १२०००/- दंडांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. चिकन व मटण विक्रेत्यांनी तातडीने परवान्याचे नुतनीकरण करावे तसेच ज्या विक्रेत्यांनी अद्यापही परवाना काढलेला नाही अशा विक्रेत्यांनी तातडीने परवाना काढण्यात यावा असे आवाहन उप आयुक्त (परवाना) वंदना गुळवे यांनी केले आहे.अशा प्रकारची कार्यवाही सातत्याने केली जाणार आहे.सहायक आयुक्त (परवाना) कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८