रक्तदान शिबिरांचे विक्रमादित्य आणि रक्तदान प्रणेते श्रीधर बुधाजी देवलकर यांना सन्मान..
मुंबई प्रतिनिधी : ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या सातव्या वर्धापन दिना निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन स्वरचित रक्तदान स्पर्धा रक्तदानावर लिहू या काही या विषयावर रक्तदान जनजागृती काव्य स्पर्धेत कामगार राज्य विमा योजना रुग्णालय कांदिवली (पूर्व) मुंबई येथील सेवा निवृत्त परंतु आजही या पवित्र कार्यात पूर्णवेळ कार्यरत असलेले रक्तपेढी विभाग तंत्रज्ञ आणि रक्तदान शिबिरांचे विक्रमादित्य श्रीधर बुधाजी देवलकर यांनी आपल्या शासकीय रक्तपेढी विभागातील सेवेतील अनुभव असल्याने आणि ते स्वतः कवी असल्याने त्यांनी या रक्तदान जनजागृती स्पर्धेत भाग घेतला.रुग्णालयात उपचारा करीता दाखल असलेले रुग्ण व गरजवंत रुग्णांना विनामूल्य रक्तकुपिंचा पुरवठा करून रुग्णांना जीवनदान मिळण्याकरिता एक छोटासा प्रयत्न करून रुग्णांना आणि त्यांच्या परिवाराच्या आनंदात आत्मिक समाधान मानणारे देवलकर यांनी रक्तदान स्पर्धेत भाग घेताना स्वरचित कवितेतून रक्तदानाचे महत्व सादर केले त्यांच्या रुग्णसेवेचा वारसा आणि रक्तपेढी विभागातील जनजागृतीचा अनुभव व त्यांची रक्तदान या विषया वरील स्वलिखत कविता ऑनलाईन व्दारे व्यक्त केली, या कवितेची दखल घेऊन देवलकर यांना या ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र या संस्थे द्वारे
सन्मान चिन्ह सन्मान पदक सन्मान पत्र सन्मानाने आणि बहुमानाने प्रदान करण्यात आले.देवलकर यांना मिळालेल्या गौरवाची दखल घेऊन समता नगर येथील सरोवा संकुल अंतर्गत जंजिरा सहकारी गृहनिर्माण संस्था आयोजित सत्यनारायणाची महापूजा आणि स्नेहसंमेलन आणि विविध स्पर्धा कार्यक्रमात देवलकर व स्वाती श्रीधर देवलकर ( परिचारिका) दांपत्य यांचा संस्थेचे अध्यक्ष सुर्वे यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी देवलकर यांनी स्वलिखीत कविता सादर करून जंजिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व प्रमुख कमिटी आणि पूजा समितीचे आभार व्यक्त केले.या शुभ प्रसंगी वाडकर यांनी सूत्र संचालन केले.विविध स्पर्धेचे आयोजन करताना महिला आणि लहान मुले मुली यांची नृत्ये फारच बहारदार होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडकर सुर्वे सुतार मालणकर करंगुटकर साळवी वळवईकर गोसावी कृष्णा आणि कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी पूजा समितीचे शेरे रेडकर आणि प्रमुख पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.श्रीधर बुधाजी देवलकर हे मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हातील देवली गावचे ग्रामस्थ आहेत.देवलकर यांना रक्तदान कार्यात तीस वर्षांच्या सेवेत प्रथमच अश्या स्पर्धेतून सादर केलेल्या त्यांच्या कवितेची दखल घेऊन त्यांना हा सन्मान मिळालेला आहे.