माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.प्रिन्सिपल मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्त्व होते.

  कुशल संघटक उत्कृष्ट संसदपटू अभ्यासू विरोधी पक्षनेते उत्कृष्ट लोकसभा अध्यक्ष असा सार्थ लौकिक असलेल्या मनोहर जोशी यांनी प्रत्येक पदावर काम करताना आपला वेगळा असा ठसा उमटवला.कौशल्य शिक्षणाचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्यांनी कोहिनूर संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुण तरुणींना तंत्र व कौशल्य शिक्षण देण्याची व्यवस्था केली. उत्कृष्ट वक्ते मितभाषी शिस्तप्रिय व राजकारणातील अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका तत्त्वनिष्ठ नेत्याला आपण गमावले आहे.जोशी हे लोकसभा अध्यक्ष असताना आपला त्यांच्याशी घनिष्ठ परिचय झाला व तो कायम राहिला.त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे राल्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८