महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी राजेंद्र मोहिते

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पदग्रहण व गोपनीयतेची शपथ

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी नेमणूक झाल्याने राजेंद्र मोहिते यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  पद व गोपनीयतेची शपथ दिली.

  सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या पदग्रहण कार्यक्रम प्रसंगी त्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८