गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना भेटी देणं सुकर व्हावं यासाठी सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक किंवा जे ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत.त्यांना मोफत तीर्थक्षेत्रांना भेटी देता याव्यात यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केल्याचं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
ही योजना सर्व धर्मातील लोकांना लागू असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे. महत्वाचं म्हणजे ही योजना केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असेल.
१) लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
(२) वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहे.
(३) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाखांपेक्षा जास्त नसावं.
आवश्यक कागदपत्रे -
(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
(२) आधार कार्ड/ रेशनकार्ड
(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
(४) सक्षम प्राधिकारांनी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला.
(५) वैद्यकीय प्रमाणपत्र
(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
(७) जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमाांक
(8) सदर योजनेच्या शर्थीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
अर्ज करण्याची प्रक्रिया -
(१) पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
(२) ज्याांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल.
(3) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.