उपनिबंधक प्रियंका गाडीलकर यांना कायद्याची माहिती नाही ?
यांना शहाजी पाटील जिल्हा उपनिबंधक सहकार्य करीत आहेत
प्रतिनिधी कल्याण : उपनिबंधक या कार्यालयाची स्थापना ही सरकारी संस्था गृहनिर्माण म्हणजेच को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायट्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत असतात. जेणे करून येथे राहणाऱ्या रहिवासींचे कोठेही काहीही नुकसान होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण सोसायट्यांच्या उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयात नोंदणी होत असतात आणि सोसायट्यांनी दरवर्षी ऑडीटरिपोर्ट, वार्षिक अहवाल हा उपनिबंधक यांना सादर करणे गरजेचे असते परंतु हे उपनिबंधक कार्यालय कल्याण येथे घडत नाही. येथील असाच एक प्रकार उघड झाला आहे. कल्याण(पूर्व) येथील रहिवासी असलेल्या महिलेने आपल्या हक्काचे घर सोसायटीच्या अध्यक्ष, सेक्रेटरी, खजीनदार यांनी वर्षिक अहवालात दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे दाखवलेले आहे. हे गेल्या ३ वर्षापासून प्रकार सुरु आहे. संबंधित महिलेने वारंवार तक्रार करून देखील यावर काही ही कार्यवाही झालेली नाही म्हणून अखेर उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दि. ९ ऑक्टोबर २०१९ व दिनांक ०१ जानोरी २०२० रोजी दाखल केली आहेत. परंतु या महिलेच्या म्हणण्यानुसार या कार्यालयाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही आणि सोसायटीचे पदाधिकारी सांगतात की आम्ही पदाचे राजीनामे दिले आहेत आणि सोसायटीच्या फलकाला काळे फासले आहे. या पुढे असे की उपनिबंधक कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीनुसार सात दिवसांमध्ये निवारण करणे, असे नागरिकांच्या सनदीमध्ये म्हटले आहे , तसेच शासन परिपत्रक क्र. सग्टपो २००२/प्र.क्र, ३६५/१४-स, मंत्रालय दिनांक २ नोव्हेंबर २००२ मधील परिच्छेद क्र.२ मध्ये एक महिन्याच्या आत निकाली काढण्याबाबत स्पष्ट म्हटले आहे तरी यांनी आज सहा महिने झाले तरी ही तक्रार निकाली काढली नाही किवा संबंधित महिलेच्या तक्रारीचे समाधान झाले नाही. आपण आदर्श उपविधीमधील तरतुद क्र.१७४ (ई) , नसार रीतसर नमूद प्राधिकरणाकडे न्याय मिळवून द्यायचा आहेत तर प्रश्न निर्माण होतो की हे प्रधिकरण कशासाठी स्थापन करण्यात आले याचा खुलासा वरीष्ठांनी किंवा उपनिबंधकांनी का केला नाही? असा , प्रश्न निर्माण होतो.
दुसरीकडे आपल्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना धमकावण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने सूचना फलक लावण्यात आले आहेत. आणि नागरिकांच्या हिताचे एकही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. तसेच नागरिकांच्या त्यांच्या समस्यांचे समाधान न झाल्यास अभ्यागतांना अभिप्राय नोंदविण्यासाठी अभिप्राय फॉर्म ठेवणे गरजेचे आहे. परंतु या कार्यालयातील प्रियंका गाडीलकर यांना याबाबत माहिती नसल्याचे सांगितले किंवा मला वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले नाही आणि तू मला लेखी मागणी कर नंतर मी त्याला लिखित उत्तर देईल परंतु आज सहा महिने झाले तरी कोणतेही उत्तर दिलेले नसल्याचे महिलेने सांगितले.
वरीष्ठांनी अशा अधिकाऱ्यांना तात्काळ घरचा रस्ता दाखविण्याची गरज आहे. जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील ही आपली जबाबदारी टाळत आहेत. अशा अधिकाऱ्यांना अधिकारी म्हणून बसण्याची गरजच काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
या पढे माझ्याकडे तक्रार करू नकोस उपनिबंधक सहकारी संस्था, कल्याण हे सक्षम अधिकारी आहेत... - शहाजी पाटील, जिल्हा उपनिबंधक, ठाणे.
-मी पत्रकारांना प्रतिक्रीया देऊ नये असे वरीष्ट्रांनी सांगितले आहेत तसेच आपण माझ्या वरीष्ठांकडून प्रतिक्रीया घ्यावी - प्रियंका गाडीलकर, उपनिबंधक, कल्याण.
- मी या कार्यालयात सुनावणीसाठी गेलो असता उपनिबंधक प्रियंका गाडीलकर यांना विविध शासन परिपत्रक यांच्या आधारे आणि नियमावलीच्या आधारे फॉर्मची मागणी केली परंतु वरीष्टांनी किंवा माहिती आयोगाने असे सांगितलेले नाही. यांना कायद्याची कोणतीली माहिती नसल्याचे लक्षात आले किंवा यांची सोसायट्यांच्या अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार यांच्या सोबत असलेले आर्थिक हितसंबंध टिकवण्यासाठी असे करीत असाव्यात आणि जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांची याना साथ असावी म्हणून या दोनही अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. या बाबत सहकार आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. - पत्रकार दिगंबर वाघ, सरचिटणीस, कोकण विभाग पत्रकार संघ, मुंबई - ९४०४४५३५८८
- प्रियंका गाडीलकर यांनी कार्यालयास आपले घर समजून नियमबाल्य पध्दतीने फलक लावून नागरिकांच्या अधिकाराला हरताळ फासले आहे व नागरिकांच्या हिताचे फलक कोठेली लावण्यात आलेले नाहीत. -विनायक चव्हाण (माहिती अधिकार कार्यकर्ते)