बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात २४ रूग्णवाहिका दाखल
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 24 रुग्णवाहिकांचे लोकार्पण
आणखीही अद्ययावत रुग्णवाहिका मिळणार
मुंबई प्रतिनिधी : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळात 85 रुग्णवाहिका मिळणार आहेत, त्यापैकी 24 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत
बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पार पडले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर्फे आणि डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 30 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत, त्यापैकी 12 रुग्णवाहिका पहिल्या टप्प्यात लोकार्पण करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे झी समूह, महिंद्रा एन्ड महिंद्रा, दीपक फर्टिलायझर्स यांनी देखील 12 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...