निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या वाहनांवर दिवा लाऊन केली दादागिरी
हिंगोली येथील निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी आपल्या खाजगी वाहनांवर अंबर दिवा लाऊन पोलिसांनाची काढली लायकी
हिंगोली प्रतिनिधी : साईनाथ भुमन्ना अनमोड वय ३१ वर्ष व्य. नौकरी पोलीस उपनिरीक्षक पो.स्टे. हिंगोली शहर समक्ष पो.स्टे.ला हजर येवून प्रथम खबर देतो कि मी पो.स्टे. हिंगोली शहर येथे २४ ऑगस्ट २०१९ रोजीपासुन पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे .
१३ जून २०२० रोजी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना बंदोबस्त कामी पोस्टे चे बंदोबस्त स्किम प्रमाण मी व सोबत पो.ना. २६८ म.पो.शि १९२ २५९ होमगार्ड १७३३ टॉफिकचे दोन कर्मचारी सह फिक्स पॉईट बंदोबस्त इंदिरा चीक हिंगोली येथे सकाळी ०८.०० वा. पासुन कर्तव्यावर हजर होतो. आज सकाळी वेळ अंदाजे ११.५० वा. आम्ही इदिरा चौक येथे वरील नमुद स्टॉफ सह हजर असताना अकोला बायपास कडून एक चारचाकी वाहन कमांक एम एच.२३ ए.एस. ७२२३ ही खाजगी चारचाकी वाहन ज्यावर अंबर दिवा लावलेला इंदिरा चौकात आली असता आम्ही सदर ची गाडी थांबवुन चालकाकडे नाव गाव विचारले असता त्या गाडीचे चालक हे हाफ चड्डीवर होते व ते नाव गाव न सांगता म्हणाले कि, मी जिल्हयाचा आर.डी.सी आहे. तेव्हा आम्ही त्यांना विचारले कि सदर गाडी सरकारी आहे किंवा खाजगी आहे. तेव्हा त्यांनी म्हटले कि सदर ची गाडी सरकारी नसून माझी खाजगी आहे. असे सांगितले. तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो कि तुम्हाला खाजगी वाहनावर अबर दिवा लावता येत नाही. तेव्हा त्यांनी म्हणाले कि, मी आर.डी.सी आहे. आता तु मला नियम शिकवणार का? तुझी काय औकात आहे बे थांब तुझ्या एस.पी.ला फोन लावतो असे म्हणुन कोणालातरी फोन लावुन आम्हावर बोलण्यासाठी दबाव टाकला परंतु आम्ही फोनवर बोललो नाही. आम्ही पो.ना. २६८ यांना गाडीमध्ये बसा आणि गाडी पोलीस स्टेशनला घ्या असे सांगुन गाडीचा दार उघडला असता त्यांनी पुन्हा आम्हाला अबे साल्या माझी गाडी सोड माझी गाडी कुठे घ्यायची ते सांग तेथे घेतो. आत्ता तुला दाखवतो असे म्हणुन धमकावले. त्यानंतर आम्ही सोबतचे कर्मचारी पो.ना. २६८ यांना गाडीत बसवून पो.स्टे.ला गाडी घ्या असे सांगुन पोस्टे ला गाडी पाठविली. आणि आम्ही आमच्या गाडीने पो.स्टे.ला हजर आलो. तेव्हा पो.नि सय्यद यांनी मला कॅबीनमध्ये बोलावलेने मी गेलो असता तेथे ही पो.नि. सय्यद यांचे समक्ष आर.डी.सी मला म्हणाले कि तुझी काय औकात आहे बे माझी गाडी पकडायची. तु मला कायदा शिकवणार का. असे म्हणत अरेरावीची भाषा करित अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही सदर घटनेबाबत सविस्तर नोंद घेतली. आमच्या नोंदी नंतर म.प्रो. पो.उपाधिक्षक जगताप यांनी ही सदर घटनेबाबत एक नोंद घेतलेली आहे. त्यावरून आम्हाला आर.डी.सी. यांचे नाव सुर्यवंशी असल्याचे समजले. त्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक काळे उपविभागीय पोलीस अधिकारी वैजने यांनी सदर प्रकरण मिटवुन घ्या असे मला समजावुन सांगितले. तसेच सदरची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.२३ ए एस. ७२२३ ही व आर. डी.सी. सुर्यवंशी यांना कोणतेही चालान न करता बेकायदेशिररित्या सोडुन दिले. आर.डी.सी सुर्यवंशी हे ११.५० वा. च्या सुमारास चेड्डीवर बाहेर निघाले होते कोणत्याही शासकीय कर्तव्यावर नव्हते याबाबत पुरावा म्हणुन ते पोस्टे ला आले होते तर त्यावेळचे पो.स्टे. चे सीसीटीव्ही फुटेज तपासिक अधिकारी यांनी हस्तगत करावे हि विनंती.
१३ जून २०२० रोजी सकाळी ११.५० वा च्या सुमारास बंदोबस्त स्किम प्रमाणे मी व सोबत पो.ना. २६८ म.पो.शि १९२ २५९ होमगार्ड १७३३ ट्रॉफिकचे दोन कर्मचारी सह फिक्स पॉईट बंदोबस्त इंदिरा चौक हिंगोली येथे सकाळी ०८.०० वा. पासुन कर्तव्यावर हजर असताना यातील आर.डी.सी सुर्यवंशी यांनी अंबर दिवा वापरणेबाबत कोणताही परवाना नसलेल्या स्वतःच्या खाजगी चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.२३ ए.एस. ७२२३ वर अंबर दिवा लावुन अरेरावीची भाषा करित, अश्लिल शिवीगाळ करून, तुला दाखवतो असे धमकावुन, आम्ही करित असलेले कर्तव्यात अडथळा निर्माण केले. म्हणुन त्यांचे विरूद्ध कलम ३५३,२९४,५०६,१८८ भादवि सह कलम १०८ केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९, सह कलम १७९ महाराष्ट्र मोटार वाहन कायदा प्रमाणे माझी प्रथम खबर आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...