होय! निवृत्तीवेतनधरकांसाठीचे ते पत्र आहे!
मुंबई प्रतिनिधी : निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा व अभिलेखे यांची पडताळणी व अद्ययावतचे काम करण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी जन्मतारीख, ई मेल पत्ता, पॅन कार्ड डिटेल्स आदी माहिती पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले होते. परंतू याच आशयाचे एक सही नसलेले पत्र व ई-मेल आयडीमुळे काही निवृत्तीवेतनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कुटूंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारीत आवाहन करण्यात येत आहे.
अधिदान व लेखा अधिकारी यांनी सुधारीत आवाहनाव्दारे कळविले आहे की, माहितीचे संकलन करुन निवृत्तीवेतन विषयक डेटाबेस ‘अपडेट’ करणे हे निवृत्तीवेतनधारकांच्याही हिताचे असल्याने, झालेला संभम्र दूर व्हावा यासाठी, निवृत्तीवेतन धारकांनी त्यांचे नाव, ई-मेल आयडी, पॅन क्रमांक व मोबाइल क्रमांक इतकीची माहिती शक्य असल्यास pao@mahakosh.in या ई-मेल आयडीवर किंवा अधिदान व लेखा कार्यालयाच्या पत्यावर पाठवावी, यापूर्वी ज्या निवृत्तीवेतनधारकांनी माहिती पाठविली असेल त्यांनी पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नसल्याचे अधिदान व लेखा अधिकारी यांनी कळविले आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...