सप्तरंगच्या पाठपुराव्यामुळे वाॅशबॅशिन नागरिकांच्या सेवेत

सप्तरंगच्या पाठपुराव्यामुळे वाॅशबॅशिन नागरिकांच्या सेवेत


रोटरी क्लब ऑफ कल्याण यांनी केडीएमसी ला दिलेले साहित्य अधिकार कर्मचारी व
 नागरिकांच्या उपयोगातकल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण 


कोरोना (कोविड-१९) मध्ये सुरक्षा स्वच्छता राखणेकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला काही सेवाभावी संस्थांनी वाॅशबॅशिन दिले होते याचा उपयोग महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांच्या व रहिवाशांच्या स्वच्छतेसाठी तसेच सुरक्षा व स्वच्छता राखण्याकरिता हे वाॅशबॅशिन झोपडपट्टीच्या विभागात वस्तीच्या प्रवेश द्वाराजवळ ठेवून नागरिकांनी आत-बाहेर जातानी हात स्वच्छ धुण्यासाठी व्हावा यासाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण रोटरी क्लब ऑफ ठाणे इस्ट यांनी हे या महानगरपालिकेला दिले होते.
    रोटरी क्लब ऑफ कल्याण यांनी दिलेले हे वॉशबॅशिन केडीएमसीच्या मुख्यालया येथे अनेक दिवसांपासून धूळ खात पडले होते अचानक सप्तरंगचे कार्यकारी संपादक हे महानगरपालिकेत त्यांच्या कामासाठी गेले असता त्यांना हे दिसले आणि त्यांनी त्या साहित्याचे फोटो काढून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अति.आयुक्त सुनील पवार सहाय्यक आयुक्त गणेश बोराडे यांना पाठवले व आयुक्त यांना विनंती केली की वाॅशबॅशिन मुख्यालयात अनेक दिवसापासून धूळखात पडले आहेत हे साहित्य आपल्या अधिकारी कर्मचारी किंवा सामान्य नागरिकांच्या उपयोगात आणावे. अन्यथा डंपिंग ग्राउंडवर जाण्यास वेळ लागणार नाही आपण थोडे लक्ष केंद्रित करावे.
   यानंतर तात्काळ अति.आयुक्त सुनिल पवार यांनी कार्यकारी अभियंता राजू पाठक पाणी पुरवठा विभाग यांना आदेश देऊन हे वाॅशबॅशिन बसवून पाण्याचे कनेक्शन लावण्यासाठी सांगितले राजू पाठक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगून ते स्वतः लक्ष देऊन बसून घेतले यासाठी अधिकारी ही सहकार्य करीत असल्याचे सप्तरंगचे कार्यकारी संपादक यांनी सांगितले पुढे ते म्हणाले की कधी कधी नजरचुकीने एखादे काम राहून जाते मात्र नागरिकांनी पत्रकार लोकप्रतिनिधींनी याचे राजकारण न करता सहानुभूतीपूर्वक कळवावे यांच्या सहकार्याने ते शक्य होते.


 


    🎤 आम्ही आमच्या कामासाठी मनपा मुख्यालयात गेलो असता आमच्या हा प्रकार लक्षात आला यानंतर आम्ही याबाबत आयुक्त अति.आयुक्त यांना याबाबत कळवले असता त्यांनी तात्काळ बसवण्याचे आदेश दिले आणि आता हे अधिकारी कर्मचारी व सामान्य नागरिक यांचा चांगल्याप्रकारे वापर करीत आहेत. -- कार्यकारी संपादक सप्तरंग


    🎤 करोना संक्रमण कालावधीत महापालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या असून त्यामध्ये वाॅशबॅशिन विविध विभागात बसविण्यात आले आहेत,यामुळे स्वच्छता राखण्यासाठी मदत होईल.-- राजू पाठक कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग केडीएमसी.


    🎤 आपल्या पाठपुराव्यामुळे हे वाॅशबॅशिन सामान्य नागरिकांना तसेच कर्मचारी अधिकारी यांना वापरण्यासाठी महानगरपालिकेने बसवले आहेत. अन्यथा हे नागरिकांना माहिती सुद्धा झाले नसते आता येथे हॅन्डवॉश लिक्विड किंवा साबण ठेवायला पाहिजेत. -- पांडुरंग निमसे जेष्ठ नागरिक


       दिगंबर वाघ
    कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


 


            घरी राहा, सुरक्षित राहा 
            प्रशासनाला सहकार्य करा...