निवृत्ती वेतनधारकांनी सविस्तर माहिती पाठवावी

निवृत्ती वेतनधारकांनी सविस्तर माहिती पाठवावीअधिदान व लेखाकार्यालयाचे आवाहन


मुंबई प्रतिनिधी  : निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा व अभिलेखे यांची पडताळणी व अपडेटेशनचे काम करण्यात येत असून निवृत्ती वेतनधारकांनी जन्मतारीख, ई मेल पत्ता, पॅन कार्ड डिटेल्स आदी माहिती पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले आहे. अधिदान व लेखा कार्यालयामार्फत माजी विधानसभा/विधानपरिषद सदस्य, माजी आयएएस/आयपीएस अधिकारी तसेच राज्य शासनाचे निवृत्त अधिकारी/कर्मचारी (70 हजार) यांना दरमहा निवृत्ती वेतन/कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाते.


       निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे नाव, निवृत्तीवेतन धारकाचा पीपीओ क्रमांक, जन्मतारीख, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, ईमेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, सध्याचा पत्ता अशी आठ मुद्द्यांवरील माहिती पाठविणे अपेक्षित आहे. मुंबई शहरातील निवृत्ती वेतन धारकांनी आपली माहिती 10 जून ते 30 जून 2020 पर्यंत तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांनी 1 जुलै ते 30 जुलैपर्यंत paopension1@gmail.com या ईमेलवर अथवा लेखा कोष भवन, ए विंग, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई- 400051 या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


    दिगंबर वाघ


          कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


           


                         घरी राहा, सुरक्षित राहा 
                         प्रशासनाला सहकार्य करा...