रास्तभाव दुकानातील ९ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

शिधावाटप कार्यालय ६ अ, सी.पी. टँक (चंदनवाडी) येथे दक्षता पथकामार्फत ९लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


                                                       - कैलास पगारे



  मुंबई प्रतिनिधी : मुंबई, ठाणे शिधावाटप यंत्रणेअंतर्गत शिधावाटप कार्यालय ६ - अ, सी. पी. टँक (चंदनवाडी) येथे दक्षता पथकामार्फत ९ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबईचे कैलास पगारे यांनी दिली.


            लॉकडाऊनच्या कालावधित जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत दि. ११ जुलै.२०२० रोजी दक्षता पथकाकडून शिधावाटप कार्यालय ६ - अ, सी. पी. टँक (चंदनवाडी) येथे अधिकृत शिधावाटप दुकान क्र ६-अ-४३ येथे टेम्पो क्र.एम.एच.-४८-बी.एम.-५४७४ मध्ये तांदूळ२१५० कि.ग्रॅ. व गहू २६०० कि.ग्रॅ., चा साठा जप्त करण्यात आला.  या  गुन्ह्यामध्ये  ९ लाख ४२हजार ४०० रूपये  इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद क्र.१३/२०२० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे."


            दिगंबर वाघ
          कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
     


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏