कर्तव्य वर्दीच, नाळ माणुसकीशी

कर्तव्य वर्दीच, नाळ माणुसकीशी....!!



मुंबई प्रतिनिधी अनंत सोलकर


        ४ जुलै २०२० रात्रपाळी कर्तव्य ०८: 00 वाजता सुरू होणार होतं सायन वरून आझाद मैदान पोलीस स्टेशन ला येण्यापासून कसरत सुरू झाली. मुंबई मध्ये अतिवृष्टी असा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा करत आकाश फाटावे आणि आकाशातील पाणी एकच ठिकाणी सांडावे तसा धो धो पाऊस चालू  होता. करोना मुळे आधीच पोलिस स्टेशन ला कर्तव्यावर कमी मनुष्यबळ आणि त्यांच्यावर असलेली अधिक जबाबदारी याचा विचार करता कर्तव्यावर पोहचणे अनिवार्य होते. असा विचार करत अनेक पर्याय तपासत एका कलीग अधिकाऱ्याच्या  मदतीने २०-२५ की.मी   चे ने जवळ वाटणारे अंतर भर पावसात बाईक वरून जाऊन एकदाच पोलिस स्टेशन ला पोहचले. आणि तस वरिष्ठांना कळविले देखील. अस वाटले आता पोलिस स्टेशनला पोहचलो म्हणजे आपण लढाई जिंकलो पण अस नव्हते खरी लढाई तर अजून सुरू व्हायची होती.


          पोलीस स्टेशनला यायला रात्री चे १० वाजले. आज ड्युटी आझाद मैदान मोबाईल क्रमांक १ वाहनावर माझी ड्युटी होती . बाहेर पाऊस धो धो कोसळत होता . त्यातच रस्त्यावर भर पावसात सतर्क नाकाबंदी चालू होती. पाऊस एवढा होता की त्यामध्ये छत्री देखील आपली साथ देऊ शकत नव्हती. नाकाबंदी ३ .00 ला संपली. मी स्टाफला पोलिस स्टेशनला जाते अस सांगुन त्यांना देखील थोडा आराम करा असे सांगितले . मी पोलिस स्टेशनला पोहचून रेन कोट काढतच होते  तोच माझ्या मोबाईलची रिंगटोन वाजली . दचकतच फोन घेतला.  समोरून आवाज आला   मॅडम   मेट्रो सिनेमाच्या समोर एक महिला जोरजोरात ओरडत आहे. तुम्ही घटनास्थळी ताबडतोब या. घड्याळात पाहिले तर पहाटेचे ४.00 वाजले होते.  नक्की काय झाले असेल असा विचार करत पुन्हा रेनकोट अंगावर  चढवला आणि भर पावसात  पायी पायी पोलिस स्टेशनहून मेट्रो सिनेमापर्यंत  गेले.  अंदाजे ७० ते ७५ वर्षाची एक महिला सांगत आली की एक बाई फुटपाथवर झोपलेली आहे आणि जोरजोरात ओरडत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे कोणी तिच्या  जवळ जात नव्हते. पाऊस  धो धो कोसळतच होता. पूर्ण रेनकोट घालून मास्क लावून मेट्रो सिनेमाला जाऊन पाहिलं तर अंदाजे ३० ते ३५ वयाची महिला  फूटपाथवर आडवी पडून जोरजोरात ओरडत होती.  सर्व स्टाफसह जवळ जाऊन पाहिलं तर  धो धो पावसात फूटपाथवर त्या महिलेच्या  अंगावर कपडे नाही आणि तिची डिलिव्हरी होत होती. हा सारा प्रकार पाहून मन सुन्न झालं. माझी सहकारी स्टाफ महिला पोलीस स्टाफ यांनी तात्काळ एवढ्या भर कोसळणाऱ्या पावसात राहत्या घरी पळत जाऊन कडपे घेऊन आली. आणि त्या महिलेला  चादर देऊन अंगावर कपडे घातली. आम्ही तो पर्यंत पोलीस कंट्रोल ला कॉल करून ambulance ची मागणी केली. हॉस्पिटला संपर्क केला पण आम्हाला मदत प्राप्त झाली नाही. त्या महिलेशी  बोलण्याचा प्रयन्त केला पण तिच्या बोलण्यातून ती आम्हाला  मतिमंद वाटली. स्वतः स्टाफ घेऊन जवळच असणाऱ्या कामा रुग्णालय येथो गेलो.


      तेथील  RMO शी बोललो त्यांना  सगळी परिस्थिती सांगितली. डॉक्टरांनी येण्यासाठी स्पष्ट नकार दिला पुन्हा चालत पावसात मेट्रो सिनेमा जवळ आलो तर महिला शिपाई यांनी सांगितले की बाळ जन्माला आले परंतु बाळाची पूर्ण नाळ बाहेर आली नाही. आता  काय करायचे  समोर  मोठा प्रश्न निर्माण  झाला. अद्याप ambulance आली  न्हवती. ती महिला जोरजोरात ओरडत होती. तिचे ते आरडणे भयाण पावसाला देखील हादरुन सोडून  काळजाचा थरकाप उडवत होते. पाऊस आपले काम चोख पार पाडत होता. जणू तो आज आमची अग्नी परीक्षाच घेत  होता. अशावेळी एखादी वयस्कर पोलिस सहकारी सोबत असती तर तिची अधीकची मदत झाली असती परंतु  आता ती  परिस्थिती आम्हालाच  हाताळणे गरजेचे होते.  अजून आम्हाला वैद्यकीय मदत मिळाली नव्हती. त्या महिलेला वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे होते. माझा स्टाफ, मी असे सगळे देवाचे नाव घेत कशी मदत मिळेल याचा विचार करत होतो आणि त्या प्रमाणे प्रयत्न चालू होते. त्यामध्ये पावसाने जणू त्याचे रौद्र रूप धारण केले होते. फोन करायला मोबाईल हातात घेतला  तर भर पावसात तो ही हाताळता येत नव्हता जणू नियती आमची कठोर परिक्षाच घेत होती . त्यात अजून भर की काय , त्या आजूबाजूला असणाऱ.


      दिगंबर वाघ  


        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏