कर्तव्याचा कल्पतर संजय हांडोरे- पाटील

कर्तव्याचा कल्पतरू.. संजय हांडोरे- पाटील 



            ५० व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठ चिंतन


        भादाणे गावचे सुपुत्र  संजय हंडोरे पाटील म्हणजे, जन्मानेच एका  पाटील घराण्यातले घरंदाज व्यक्तिमत्व, कृषितज्ञ, निसर्गप्रेमी, समाजप्रेमी कलाप्रेमी, देशहितवादी बालप्रेमी, तरुणहीतवादी अशी अनेक क्षेत्रातुन त्यांची ओळख देता येईल,,,,, असे त्यांचे महत्कार्य मुरबाड शहापूर या  दोन्हीही  तालुक्यात सुपरिचित आहे .
       नव्या पिढीतील सुशिक्षित सृजनशील माणूस अशी त्यांची ओळख त्यांच्या जन्मगावातूनच उदयास आली, शांत, संयमी, सुस्वभावी, मधुरभाषी असे बहुआयामी या व्यक्तिमत्वा विषयी लिहावे तेवढे थोडेच वाटेल,,,, अगदी बाल वयातच त्यांनी दिनांक १५ जुलै १९८९ साली भादाणे गावातील एक व्यक्ती श्री बारकु शंकर हांडोरे हे  विहिरीमध्ये बुडत असताना या व्यक्तीला, स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले आहे,,,,,,
             दिनांक १ऑक्टोबर १९८३ रोजी दसऱ्याचा सण साजरा होत असताना ,भादाणे गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या टेकडी जवळ  मुरुमाची दरड कोसळून त्या खाली दबून गेलेल्या तीन व्यक्तीं  हरिभाऊ भाऊराव यशवंतराव, जयवंत हरिभाऊ यशवंतराव,व  विलास हरिभाऊ यशवंतराव, यांना वाचवण्याकरिता समयसूचकता, अचूक निर्णय घेऊन  त्यांना,जीवदान देण्याचे एक धाडसी कृत्य त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी  करून दाखवले आहे,,,, 
            कुठल्याही कले बद्दल त्यांना प्रचंड आदर आहे परिसरातील लोककलाकार,आदिवासी कलाकार, भजन, प्रवचन कीर्तनकार यांच्याबद्दल विशेष आदर ते बाळगतात फ्रेंड्स फिल्म्सच्या अनेक अलबम्स मध्ये त्यांनी कलाकार म्हणून कामही केले आहे,,, 
                                                      प्रचंड इच्छाशक्ती ,धाडसी वृत्ती,आणि आत्मविश्वास या त्यांच्या खास गुण  वैशिष्ट्यामुळे गाव पातळीवरील असंख्य समस्या त्यांनी लीलया करून सोडविल्या आहेत,,, अनेक तरुणांची दारू सोडवून त्यांना व्यसनमुक्त करून रोजगाराचे महत्व पटवून देऊन उत्तम जीवन जगण्यास प्रवृत्त केले आहे.  
                   राजकिय कार्यास सुरुवात करण्याअगोदर भादाणे गावचे सरपंच पद भूषवत असताना तंटामुक्त गाव,
व्यसनमुक्त गाव, 100 %  मोकाट गुरेबंदी, सार्वजनिक वाचनालय, इको फ्रेंडली  मखर सजावट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, किल्ले सजावट स्पर्धा, अण्णा हजारेंच्या लोकपाल विधेयक आंदोलनास पाठिंबा म्हणून त्यांनी विशेष ग्रामसभाघेऊन आंदोलनास बहुमताने ठराव संमत करून पाठिंबा दिला होता. तसेच 2007 साली ग्रामसभेत जगावेगळा ठराव प्रथमच पास केला तो म्हणजे घरपट्टीवर पती सोबत पत्नीचे नाव लावण्यात आले ,त्या मुळे  अनोळखी गुन्हेगारांना कोर्टात जामीन राहण्याच्या  बोगस पद्धतीला 100% आळा बसला.  
              गावात *इयत्ता दहावी,बारावी ला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वज वंदन व ध्वजारोहण करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी ग्राम सभेत व शिक्षण समितीमध्ये घेतला. त्या मुळे शैक्षणिक प्रगतीमध्ये गावातील हुशार विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक चुरस वाढली,


 सरपंच पदी असताना सर्व ग्रामसभांचा १००टक्के कोरंम यशस्वी पूर्ण केला, त्यांच्या काळातील एकही ग्रामसभा तहकूब नाही. सरपंच पदाच्या सन २००७,८,९या कार्य काळात प्रत्येक ग्रामसभेची सुरुवात गावातील ह भ प दौलत गुरुजी,व ह भ प ग.ल.गायकर गुरुजी यांच्या ज्ञानेश्वरीवरील पारायणाने केली गेली, ग्रामसभेचा अध्यक्ष गावातील सामान्य नागरिक निवड करण्याकरिता ग्रामसभेत ठराव समंत करून त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. ....
           सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत व ४० शेतकर्यांमार्फत वीस हजार  साग वृक्षांची  यशस्वी लागवड करून घेतली, असे अनेक उपक्रम गावात राबवून तालुक्यात भादाणे गावाची एक नवी ओळख त्यांनी निर्माण करून दिली आहे, तसेच भादाने  व संगम गाव ग्रामपंचायतीस वनविभागाकडून अनुक्रमे   १४८ व ३७ एकर  जमीन वनहक्क कायद्याने मिळवून दिली आहे. त्याकरिता त्यास प्रचंड मेहनत व संघर्ष करावा लागला. म्हणतात ना सेवाभाव हा मूळ वृत्तीतच असावा लागतो, मग ती सेवा कुठलीही असो असेच काहीसे अनुभव  संजय हंडोरे पाटील यांच्या बद्दल मी अभिमानाने सांगू  इच्छितो,जे  स्वतः मी पाहिलेले आहेत, अनुभविलेले आहेत, कुठल्याही विषयावर अभ्यासपूर्ण सूत्रबद्ध बोलणे ही त्यांची खास वक्तृत्व शैली आहे, ते उत्तम वक्ते आहेत , उत्तम अभ्यासक आहेत. समीक्षक आहेत. कोकण वैभव या  साप्ताहिकाचे संपादक आहेत.  सामाजिक जीवनावरील त्यांचे अनेक लेख टोपण नावाने सुप्रसिद्ध आहेत .ते उत्तम लेखक ही आहेत
        दयाभव हा त्यांचा एक विशिष्ट स्वभाव पैलू आहे .कुठेही अपघात झाला की स्वतःचे काम सोडून अपद्ग्रस्तना इस्पितळात दाखल करणे .विविध सामाजिक क्षेत्रात देणग्या तसेच सहृदय मदत करणे. असेच एक उदाहरण सांगतो. दि.७ऑगस्ट २००९ ची रात्र होती. गावातील एका गरीब घराण्यातील  एक मुलगी तिचे नाव चंदा बुधाजी हांडोरे या मुलीला तीव्र अश्या विषारी जातीच्या मण्यार  सापणे चावा घेतला होता, पावसाळ्याचे दिवस गावत, वाहन उपलब्ध नव्हते त्या मुलीचे कुटुंब हतबल झाले होते. विष भरभर अंगात चढत होते. तशी तिची प्रकृती गंभीर होत होती. शेवटी त्या कुटुंबतील एक व्यक्ती संजय हंडोरे पाटील यांच्याकडे आली आणि मग उपचाराला गती मिळाली किन्हवली, शहापूर नंतर ठाणे सिव्हिल हॉस्पिटल असा उपचार दौरा स्वतःच्या वाहनाने करत समयसूचकता दाखऊन,व  पत्रकारितेच्या माध्यमातून , वरिष्ठांच्या मदतीने दबावतंत्र वापरून अखेर त्या मुलीचा जीव वाचला याचे सारे श्रेय संजय हंडोरे पाटील यांनाच जाते,
        आशीच जनसेवा करत करत आजमितीला नावारूपास आलेला  त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनात जपलेली माणुसकी आपुलकी फळास आली .असेच म्हणावे लागेल त्यातच दुग्ध शर्करा योग म्हणजे,,,,,,,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक आदर्श व्यक्तींचे,, लाभलेले आशीर्वाद व मार्गदर्शन...... त्या मुळे शहापूर मुरबाड या दोनीही तालुक्यात तसेच कोकण विभागात  राजकीय व समजिक क्षेत्रात संजय हंडोरे पाटील याना प्रचंड लोकप्रियता मिळू लागली आणि संजय हंडोरे पाटील यांनी आपल्या जन्मगावासह दोन्ही तालुक्यात व कोकण विभागात आपले नाव तरुणांच्या हृदयावर शिक्का-मोर्तब केले.
              स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणी आंदोलनात दिनांक ९ऑगस्ट२००८ रोजी मुंबई आझाद मैदान येथे स्वत एकदिवसीय कारावास भोगला. देव ,देश आणि धर्म याचे यथायोग्य पालन करून शक्यहोईल तितके धार्मिक  कार्यास योगदान दिले . 
         भादाणे गावातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना इंदिरा आवास योजने अंतर्गत जवळ जवळ १५३ घरकुले मिळवून दिली त्यांच्याय महान कार्यामुळे भादाणे गावात आजमितीला एकही कुडा-मेडाचे घर शिल्लक राहिले नाही त्या मुळे दरवर्षी आगलागून होणारे नुकसान पूर्णतः कमी झाले,
         तरुणांची व्यसनाधीनता कमी होऊन त्यांनी उत्तम आरोग्याकडे लक्ष द्यावे याकरिता संजय हांडोरे पाटील यांनी प्रचंड मेहनतीने मुरबाड तालुक्यात १०० व्यायामशाळा मंजूर करण्याकरिता प्रयत्न व सहकार्य केल्याने, त्या कार्याचा लाभ तरुणांना होत आहे..तसेच ठाणे- पालघर जिल्ह्यात २७५ व्यायाम शाळा मंजूर करण्याकरिता प्रयत्न केल्याने ,खरोखरच हे एक भीमकार्यच करून दाखविले आहे, 
             पत्रकारांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढण्यासाठी व कोकणावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध वाचा फोडण्यासाठी दि.  ५ जुलै २०१२ रोजी, कोकाण विभाग पत्रकार संघाची स्थापना करून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जसे इवलेसे रोप लावीयले द्वारी l
              त्याचा वेलू गेला गगना वरी ll
      बघता बघता आज संपूर्ण  कोकणात कोकण विभाग पत्रकार संघाच्या  ४७ तालुका कमिट्या, ७ जिल्हा कमिट्या, व २ विभागीय कमिट्या आहेत   असा साडेचारशे पत्रकारांचा आमचा संघ परिवार नावारूपास आला याला एकमेव कारण  म्हणजे  संजय हंडोरे पाटील ! माझ्या गावात असा सर्वांगीण सुंदर, गुणवान, सच्चा माणूस जन्मला आणि अशा माणसा साठी मला काहीतरी लिहिण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.   हे माझे भाग्यच  माझ्या गावच्या या कर्मयोग्याला मी इतकेच म्हणू शकेन.... 


          कर्तव्याचा कल्पतरू !  


 ५ जुलै माझ्या मित्राचा वाढदिवस आहे त्यानिमित्त  ,,,माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा रविंद्र यशवंतराव(देशमुख) यांच्या लेखणीतून...


             दिगंबर वाघ
           कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


 



 घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा,अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏