दुध खरेदी दरांबाबत उद्या महत्त्वाची बैठक

दूध खरेदी दरांबाबत उदया दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार


यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकमुंबई प्रतिनिधी : दुधाचे दर  घटल्यामुळे  दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता. २१) दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे.


            राज्यात गेल्या चार महिन्यांपासून 'कोरोना'मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्यामुळे दूध संघाने दूध खरेदी दर कमी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला वाजवी दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे, अशी मागणी करत आहेत. या विविध समस्यांच्या अनुषंगाने शेतकरी आणि दुध संघाचे प्रश्न समजावून घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


            पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात मंगळवारी दुपारी दोन वाजता ही बैठक होत आहे. या बैठकीला ‘महानंद’चे अध्यक्ष, दूग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे  प्रमुख,  तसेच राज्यभरातील  विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत.


  दिगंबर वाघ  


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏