आयडीएफ व साईटल फॅमिलीचा पार्कसाइट करांना मदतीचा हात
मुंबई प्रतिनिधी : लॉक डाऊन च्या काळात मोलमजुरी करणारे हातावरचे पोट असणाऱ्यांचे रोजगार बंद झाले हाताला काम नसल्यामुळे या कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून आय डी एफ फॅमिली व साईटल फॅमिली यांनी विक्रोळी पार्क साइट वर्षा नगर येथील नागरिकांना मदतीचा हात पुढे केला व गरजवंतांना रेशनचे किट सॅनिटायझर मास इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे सामाजिक कार्यकर्ते बाळू म्हस्दे, सोनाली म्हस्दे यांच्या सहकार्याने मोफत वाटप केले यावेळी आयडीएफ फॅमिली सिईओ डॉ. नारायण मॅनेजर अनिस ,सितेल फँमिलीचे व्यवस्थापक उझैर सर ,सम्राट मित्र मंडळाचे कार्यकर्ते अंकुश जगधने , तुशांत मिठभावकर, पंकज कदम, संजय पाटील आदींसह असंख्य मान्यवर उपस्थित होते वर्षा नगर विभागातील सुमारे 125 कुटुंबांनी या मदतीचा लाभ घेतला.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏