कोकणचा चाकरमनी अजूनही उपेक्षित आहे


रत्नागिरी प्रतिनिधी अनंत सोलकर : कोकणचा चाकरमनी अजूनही उपेक्षित राहिला आहे आज गणेश उत्सव पंधरा दिवसाच्या तोंडावर येऊन राहिला आहे अजून देखील शासनाने कोकणवासीयांसाठी ठोस निर्णय घेतला गेलेला नाही कोकणा मध्ये जाण्यासाठी एसटी बस व्यवस्था करणार अशी आस व आश्वासने देऊन ठेवले गेले आहेत परंतु या अगोदरच कोकणातील चाकरमानी खाजगी बस व्यवस्थापकांच्या जाळ्यात अडकून बसले आहेत आज गावी जाण्यासाठी ज्या ठिकाणी पाचशे रुपये द्यावे लागायचे त्या ठिकाणी आज दोन ते अडीच हजार रुपये द्यावे लागत आहेत त्यामुळे एकीकडे बेरोजगारी ला कंटाळलेला हा चाकरमानी आता गावी जाण्यासाठी देखील दुप्पट-तिप्पट भाडे देऊन  त्याची खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांकडून फसवणूक होत आहे पालकमंत्री सुद्धा अजून लोकांना संभ्रमावस्थेत टाकत आहेत आज जर योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी झाली असती तर लोकांनी या अगोदर एसटी बुक करून ठेवल्या असत्या त्याच बरोबर त्याचा फायदा एसटी महामंडळाला देखील झाला असता आता ऐन वेळेस एसटी बुक करू शकत नाहीत त्याचप्रमाणे गावी गेल्यानंतर सुद्धा पंधरा दिवस कॉरन टाइन  रहावे लागणार आहे। त्यामुळे धड ना इकडे आणि धड ना तिकडे अशी अवस्था या चाकरमान्यांची होऊन बसली आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय जाहीर करण्यात यावा जिल्ह्यांसाठी लागणार इ पास बंद करण्यात यावा अशी मागणी चाकरमान्यांना कडून केली जात आहे.


     दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏