वाघिवळीवाडा ऐतिहासिक लेणी संवर्धनासाठी आर पी आयचे प्रयत्न

वाघिवळीवाडा ऐतिहासिक लेणीच्या संवर्धनात RPI डेमोक्रॅटिक


अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना घेराव आंदोलन करण्याचा इशारा..



 नवी मुंबई प्रतिनिधी  राजन माक्निकर


        नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माणाअंतर्गत होत असलेल्या कामात मुजोर सिडको अधिकाऱ्यांनी येथे असलेली प्राचीन व ऐतिहासिक लेणी बुजवून बौद्धांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून राष्ट्राची मौलिक संपत्ती नष्ट केली आहे, याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
       ऐतिहासिक प्राचीन राष्ट्रीय धरोहर व बौद्धांची अस्मिता असलेली वाघिवळीवाडा लेणी येथील जातीवादी सिडको व विमान प्राधिकरण प्रशासनाने हेतुपुरस्करपणे बुजवून ऐतिहासिक वास्तू नष्ट केली आहे, याच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन असल्याची माहिती राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 
 भारतासह राज्यात बौद्धांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत, मनुवादाचे विष पसरले जात आहे, बौद्धांना टार्गेट करण्यात येत आहे, आज मुस्लिम, बौद्ध व आदिवासी सुरक्षित नसून संविधानाच्या मौलिक अधिकाराची पायमल्ली होत आहे, महामानवाच्या पुतळ्याची विटंबना शिवरायांच्या विचारांची कुचंबणा होत आहे हे रोखण्यात सरकार अपयशी ठरली असून ऑगस्ट मध्ये होणाऱ्या अधिवेशनात मुख्यमंऱ्यांना घेराव घालण्यात येणार असल्याचेही पत्रकाद्वारे म्हंटले आहे. 
          आंतरराष्ट्रीय परिचित पुज्य भदंत शिलबोधी यांच्या नेतृत्वात भिखु संघ लेणी बचावासाठी एकांगी पडला आहे यासाठी मुंबई प्रदेश अध्यक्ष हिरामण साळवी, महाराष्ट्र महासचिव श्रावण गायकवाड, रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र जोंधळे, नवी मुंबई अध्यक्ष रत्नाकर रणदिवे आंदोलनाची बांधणी करत असून येत्या बुधवार १२ ऑगस्ट रोजी युवाध्यक्ष कनिष्क कांबळे लेणी स्थळाला भेट देऊन सिडको प्रशासनाला जाब विचारणार आहेत.


      दिगंबर वाघ
    कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
     


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य ,अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏