कै. अण्णा चव्हाण प्रतिष्ठान भांडूप येथे स्वातंत्र दिन साजरा

कै. अण्णा चव्हाण प्रतिष्ठान भांडूप येथे स्वातंत्र दिन साजरामुंबई  प्रतिनिधी : कै.आण्णा चव्हाण प्रतिष्ठान, भांडुप ने साजर केले ७४वे स्वातंत्र्य दिवस, दरवर्षीप्रमाणे भांडुप पश्चिम च्या तुलशेतपाडा विभागात कार्यरत असलेल्या सेवा भावी संस्था कै. आण्णा चव्हाण प्रतिष्ठान शिवनेरी सदन चौकात ,भांडुप पोलीस से सहायक पोलिस निरीक्षक  ठाकूर साहेब व पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत देते यांचा हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस कार्यक्रम साजरे केले, या शुभप्रसंगी लोकांना जलेबी वाटप करण्यात आली. ध्वजारोहण नन्तर संस्थेच्या माध्यमातून विभागातील १५ गरजू कुटुंबाना भांडुप पोलीस ठाणे चे सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पारतकर यांचा हस्ते धान्य वाटप करण्यात आले. या ठिकाणी झेंडावंदन ची सुरुवात सन १९७८ २६जानेवारी ला कांग्रेस चे वरिष्ठ नेते स्वर्गीय श्री आण्णा चव्हाण यांनी केले होते, त्यांच्या स्वर्गवास नंतर  विशाल चव्हाण व मिञ मंडळी ने अण्णांचा स्मरणार्थ कै.आण्णा चव्हाण प्रतिष्ठान संस्थेच्या स्थापना केली. या संस्थेने आजपर्यंत एकूण १७  आरोग्य  शिबिर, लकडाऊन मध्ये एकूण ७०० कुटुंबाना धान्य वाटप', सन्मानीय खासदार श्री मनोज भाई यांच्या माध्यमातून प्राप्त आर्सेनिक अलबम गोळ्या २००० पेक्षा जास्त कुटुंबाना वाटप, भांडुपच्या विविध विभागात निःशुक्ल जंतुनाशक औषध फवारणी, तर सध्या दीपिका करुणाई NGO यांच्या माध्यमातून प्राप्त पौष्टीक आहार वितरण एकूण ३०० कुटुंबाना केले आहे. 
       संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष यांनी स्वतः वाढीव वीजदर विरोधात महावितरण कार्यालयात अर्ज देऊन वाढीव वीजदर मागे घेण्यासाठी विनंती केली.


       दिगंबर वाघ             


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏