श्रमिक(मु) पत्रकार संघ मुंबई व जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांनी हा सन्मान केला
ठाणे प्रतिनिधी : सप्तरंगचे कार्यकारी संपादक तथा कोकण विभाग पत्रकार संघ मुंबईचे सरचिटणीस दिगंबर वाघ यांचा सन्मान करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की श्रमिक (मु) पत्रकार संघ मुंबई हे पत्रकार यांच्या अन्यायाविरुद्ध काम करीत असून या संघाचे अध्यक्ष प्रकाश संकपाळ यांनी हे सन्मानपत्र दिले तसेच जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्था ही महाराष्ट्रभरात वाहनचालकांना येणाऱ्या अडी-अडचणी मध्ये मदत करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था असून यांचे आजपर्यंतचे कार्य खूप मोलाचे असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण वाघ यांनी हे सन्मानपत्र दिले आहेत.
सन्मानपत्र देण्याचा उद्देश म्हणजे दिगंबर वाघ यांनी कोरोना ( कोविड-१९) अशा महामारी सारख्या आजारात आपले वृत्तपत्र अतिशय अविरतपणे चालू ठेवून घरातच राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले अशा महामारी च्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्यक्ष जाऊन बातम्या संकलित केल्या यासाठी यांना त्यांच्या अनेक प्रतिनिधींनी साथ देऊन उत्कृष्ट लिखाण केले तसेच गरजूंनपर्यंत पोहोचण्याचे काम केले आणि गरजू नागरिकांना मदत सुद्धा करण्याचे काम केले. यांना प्रशासनानेही योग्य ते सहकार्य केले आहेत. यासाठी यांना हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यांनी या संघाचे व संस्थेचे मनःपुर्वक आभार मानले आहेत.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा,
अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏