भा. ज. पा. महाराष्ट्र प्रदेश महिला यांच्याकडून कोरोना योध्दा म्हाणून गौरव

आनंद गोसकी यांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कडुन कोविड योध्दा गौरवपञ 




सोलापूर प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाउनच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समाजकाकार्य करणाऱ्या सोलापूर शहरातील काही समाजसेवक व पञरकार बांधवांचा भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सर यांच्या कडुन कोव्हिड योध्दा गौरवपञ जनाधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोसकी यांना गौरवण्यात आल. 
       कोरोना सारख्या महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जवळपास ३००० लोकांची थर्मल स्क्रिनिंग द्ववारे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली व कोरोना या महामारी विषयी सोलापूर शहरात जनजागृतीच्या माध्यमातुन नागरिकांना घरात राहून सहकार्य करण्याची विनंती ५०० मास्क व २०० सेनिटायझर बाॅटल वाटप  केली.बेघर,गरजू लोकांना २१ मार्च पासून आजही दोन वेळेचे जेवण देत आहे.आयुष मंञालयाने शिफारस केलेल्या अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या ५०० पेक्षा ही अधिक कुटूंबांना मोफत घरोघरी जाऊन आनंद गोसकी मिञ परिवाराकडून वाटप करण्यात आले.कोरोनामुळे भितीचे वातावरण असल्यांने आपल्या परीसरातील लोकांनी हाॅस्पिटलला जाणे शक्य नसल्याने डाॅक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवून ३०४नागरीकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आले.कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आनंद गोसकी यांच्या वाढदिवसानिम्मित्त १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.आनंद गोसकी यांनी निस्वार्थ भावनेतून केलेल्या रूग्णसेवेची व इतर सामाजिक कार्याची दखल भाजपा महिला आघाडी ने घेतले,व आनंद गोसकी यांना बहिण म्हणुन राखी बांधुन औक्षण करण्यात आले.भारतीय जनता पार्टी महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश चे भाजपा महिला मोर्चा चे उमाताई खापरे,ईंदिरा कुडक्याल वसंत कामुर्ती व सर्व पदअधिकारी  उपस्थित होते.


          दिगंबर वाघ
       कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
     


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏