एलिफंटा पर्यटन स्थळाचा विकास तातडीने करावा

एलिफंटा पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तातडीने सादर करावा


                        - आदिती तटकरेमुंबई : एलिफंटा पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करुन तो तातडीने सादर करावा, अशा सूचना पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी दिल्या. आज मंत्रालयात एलिफंटा पर्यटन स्थळाच्या विकासासंदर्भात राज्यमंत्री  तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.


     कु.तटकरे म्हणाल्या, पर्यटनाला चालना मिळेल आणि विकासकामांना गती येईल, असा एलिफंटा पर्यटन स्थळाचा सुधारीत विकास आराखडा तयार करुन तातडीने सादर करावा. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पर्यावरणपूरक विकासकामांवर भर देण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी बैठकीला पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. अमित सैनी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.दरम्यान पर्यटन क्षेत्राचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन अजिंठा-वेरुळ येथील लेण्यांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. या संदर्भात अजिंठा लेणी पोर्ट्रेटचे सादरीकरण करण्यात आले.


  दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏