त्या लाचखोर अधिकाऱ्यांच्या वंशावळाची चौकशी करा

"त्या" लाचखोर अधिकाऱ्यांच्या वंशावळ संपत्तीची चौकशी करून कायदशीर अटक करावी.


     - पँथर डॉ राजन माकनिकर



मुंबई प्रतिनिधी : एम आय डी सी उप अभियंता व सहायक अभियंता यांनी लाच घेतल्याच्या अनंत तक्रारी करूनही वरिष्ठांकडून कसलीच दखल घेतलि जात नसून लवकरच "त्या" लाचखोर अधिकाऱ्यांची वंशावळ संपत्तीची चौकशी नाही केल्यास तीव्र पडसाद उमटतील असा इशारा पँथर डॉ माकणीकर यांनी दिला आहे.
     एम आय डी सी अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीकडून लाखो रुपयांची लाच घेतली व त्या रकमेच्या व्याजापोटी व वेळेत काम न झाल्याने आजाराने ग्रास्थ होऊन कर्जबाजारी अवस्थेत त्या इसमाने आत्महत्या केली असल्याचे वारंवार तक्रारी अर्ज देऊनही वरिष्ठ अधिकार्या मार्फत कसलीच कारवाई न झाल्याने कुटुंब हतबल होऊन न्यायांच्या प्रतीक्षेत आहे. एम आय डी सी कार्यालयातील उपअभियंता व सहायक अभियंता या दोघांच्या संगनमताने लाखो रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणाची व्हिडीओ चित्रफीत आपल्याकडे असून शेकडो अर्जं करूनही प्रशासन त्या अधिकाऱ्यांना का वाचवत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
     लाच घेणाऱ्या दोन अधिकार्यापैकी इ अधिकारी सेवा निवृत्त झाले असून त्यांचे पेन्शन थांबवून दोन्ही अधिकाऱ्यांच्या वंशावळ संपत्तीची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन एमआयडीसी प्रशासनाला दिले आहे. योग्य ती कारवाही नाही  झाल्यास आंदोलन उभारणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..